भीमाशंकर (पुणे) -पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण भीमाशंकर परिसरात रात्रभर पडलेल्या मुसळधार पाऊस पडला. रात्रभर झालेल्या पावसाने मंचर भिमाशंकर महामार्गावरील पोखरी घाटात दरड कोसळही आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर तिकडे माळीण डिंभे रोडवरील आहुपे येथेही दोन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने आंबेगाव तालुक्यात तीन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी भात शेतीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरड कोसळल्याने श्री क्षेत्र भीमाशंकरला जाणारा मार्ग बंद - भीमाशंकर रस्त्यावर दरड कोसळली
भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून पोखरी घाटात रस्त्यावर दरड कोसळल्याने सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड व झाडे पडल्याच्या घटना घडल्याने मंचर भीमाशंकर रस्तावरील वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली आहे. पोखरी घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळून माती व दगड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले आहेत.
पोखरी घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद -
भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून पोखरी घाटात रस्त्यावर दरड कोसळल्याने सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड व झाडे पडल्याच्या घटना घडल्याने मंचर भीमाशंकर रस्तावरील वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली आहे. पोखरी घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळून माती व दगड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले आहेत. संततधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे दरड हटवण्याचे काम तूर्त थांबवण्यात आले आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास आणखी दरडी कोसळण्याची तसेच झाडे कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पोखरी घाटातील सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.