पुणे - मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर झाला. निकालनंतर चर्चा सुरू असते होते ती सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची. मात्र, पुण्याच्या एका विद्यार्थ्याचे नावही खुप चर्चेत येत आहे. सर्वाधिक गुण मिळविले म्हणून नाही, तर सर्व विषयामध्ये 35 गुण मिळविल्याने. श्रावण राजेश साळुंके असे त्या सर्वच्या सर्व विषयात तो 35 गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
35+35+35+35+35+35=210; पुण्यातील विद्यार्थ्याच्या यशाचं गणित
परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. राज्यात विविध विभागात कोण प्रथम, कोण द्वितीय तसेच कुठल्या प्रशालेचा किती टक्के निकाल लागला याची जोरदार चर्चा सुरू असते. त्यामुळे नेहमी फक्त जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावच चर्चेत येत असते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. राज्यात विविध विभागात कोण प्रथम, कोण द्वितीय तसेच कुठल्या प्रशालेचा किती टक्के निकाल लागला याची जोरदार चर्चा सुरू असते. त्यामुळे नेहमी फक्त जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावच चर्चेत येत असते.
श्रावण हा पुणे शहरातील धनकवडी परिसरातील रोहन माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे. या निकालानंतर त्याच्या नावाची एकदम चर्चा सुरू झाली. सर्वच विषयात 100 गुण मिळवणे जितके अवघड असते, तितकेच काहीसे अवघड सर्व विषयात 35 गुण मिळवणे आहे. त्याला एकूण ३५ टक्के गुण मिळाले. पण ही किमया श्रावणने साधली आहे.