बारामती- कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून (ता. 23) बारामतीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज हा निर्णय घेतला. उपविभागीय अधिका-यांच्या दालनात झालेल्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर पोलीस कारवाई
दरम्यान, शहरातील सूर्यनगरी व गणेश मंडई परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून पुढील आदेश येई पर्यंत या परिसरातील सर्व व्यवहार, दुकाने बंद राहणार आहेत. हा निर्णय घेण्याअगोदर उपविभागीय अधिका-यांनी व्यापा-यांची बैठक बोलावून घेत त्यांनही पूर्वकल्पना देण्यात आली. संध्याकाळी सातनंतर बारामतीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही व्यवहार सुरु राहणार नाहीत, लोकांनीही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त रस्त्यावर येऊ नये, विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर पोलीस कारवाई केली जाईल. जे दुकानदार सॅनीटायझर, ग्राहकांच्या नोंदी तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
हॉटेल चालकांना संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्यास मान्यता.....
हॉटेल चालकांना संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मास्कसंदर्भात पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान आजपासून पोलीस ही कारवाई वेगाने करणार आहेत. दुसरीकडे एमआयडीसी परिसरातही कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने त्याबाबत उपविभागीय अधिकारी उपाययोजना करणार आहेत. उद्यापासून नटराज नाट्य कला मंडळ तिसरे कोविड केअर सेंटर तारांगण वसतिगृहाशेजारी सुरु करणार असल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली. नटराजच्या दोन कोविड केअर सेंटरची 200 रुग्णांची क्षमता संपल्याने आता तिसरे सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे गुजर म्हणाले.
बारामती; आस्थापना, दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार - बारामती लेटेस्ट न्यूज
बारामती शहरात संध्याकाळी सातनंतर बारामतीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही व्यवहार सुरु राहणार नाहीत, लोकांनीही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त रस्त्यावर येऊ नये, विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर पोलीस कारवाई केली जाईल.
![बारामती; आस्थापना, दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार बारामती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11113238-1034-11113238-1616417157146.jpg)
हेही वाचा-मुंबई : महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली, मुंबईतील अनेक चित्रपटगृहात अँटिजेन टेस्टच होत नाहीत
हातगाडीचालक, फेरीवाले यांच्याही होणार तपासण्या....
मेडीकल कॉलेज, नटराजची दोन्ही सेंटर्स, सिल्व्हर ज्युबिली व रुई ग्रामीण रुग्णालय सध्या हाउसफुल्ल अवस्थेत आहे. त्या मुळे आता तिसरे सेंटर सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, शहरात अधिग्रहीत केलेल्या सोळा रुग्णालयांची स्वताः डॉ. काळे व डॉ. मस्तुद उपविभागीय अधिका-यांच्या उपस्थितीत जागेवर जाऊन पाहणी करणार आहेत. ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही अशा रुग्णांना जनरल वॉर्डात हलवून तेथे ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते अशा रुग्णांसाठी बेड रिकामे करण्याचा हा प्रयत्न असेल. दरम्यान, शहरातील हातगाडेचालक, फेरीवाले यांच्याही आरटीपीसीआर तपासण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील ८० हजार लोकांची तपासणी......
बारामती शहरातील साडेसातशे फेरीवाल्यांची यादी काढण्यात आली असून त्यांच्याही तपासण्या केल्या जाणार आहेत. बारामतीतील तपासणीबाबत गेल्या काही दिवसात बारामती नगरपालिकेने युध्दपातळीवर सर्वेक्षण करत शहरातील जवळपास ८० हजार लोकांची तपासणी केली आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी शहरात नगरपालिका भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर घेणार आहे. या माध्यमातून औषधफवारणी केली जाणार आहे.
हेही वाचा-शरद पवारांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न - सुधीर मुनगंटीवार