पुणे - राज्यात कोरोनाचे सावट असून यंदादेखील होत असलेल्या गणेश उत्सवासाठी पोलिसांकडे नियमावली लागू करण्यात आली आहे. प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकां यंदाही परवानगी देण्यात आलेली नाही. तर अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे पिंपरी-चिंचवड आणि कॅंटोन्मेंट परिसरातील सर्व च्या सर्व दुकाने बंद राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार लोकप्रतिनिधींनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी सांगितले. विधानभवन येथे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यपाल तर महामहिम त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा आणि समर्पण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सहकार रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. सायकल रॅलीच्या कार्यक्रमाप्रसंगी एका महिला सायकलपटूचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क माणूस स्वतःच्या हाताने काढला. यावर अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. राज्यपाल महामहिम आहेत. मी त्यांच्याबद्दल बोलणे उचित नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. ते आम्हाला शपथ देतात. तो त्यांचा अधिकार असतो त्यांच्या अधिकारावर बोलणे योग्य नाही, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा -मुख्यमंत्री ठाकरे भाजपच्या नेत्यांना म्हणाले, भविष्यातील सहकारी.. त्यावर रावसाहेब दानवेंनी दिली सूचक प्रतिक्रिया
केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करावे -
जीएसटी परिषदेला मला उपस्थित राहता आले नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांना मी पूर्वकल्पना दिली आहे. जीएसटी परिषदेत महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे जे मुद्दे आणि राज्याच्या भूमिका अर्थमंत्री निर्मला सिताराम यांना पत्राद्वारे मांडण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षात समावेश करण्यासाठी राज्याची भूमिका म्हणजे जीएसटी अंतर्गत पेट्रोल -डिझेलचा समावेश करण्याचा आहे. वन नेशन वन टॅक्स हे सूत्र संपूर्ण देशाने अंगिकारल्यामुळे अनेक गोष्टी या केंद्राकडे जाऊ लागल्या आहेत. केंद्राने त्यांच्या अधिकारात जे काही टॅक्स येत आहेत ते त्यांनी करावे. मात्र, हळूहळू राज्याचा कर लावण्याचा अधिकार हा केंद्र आपल्या हाती घेऊ लागत आहे. गेल्या दीड वर्षापासून राज्य कोरोनाशी मुकाबला करत आहे. कोरोनामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तसेच सातत्याने पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत. आम्हीदेखील चिंतेत आहोत. केंद्र पेट्रोलवर 32 रुपये 90 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलवर 31 रुपये प्रतिलिटर कर आकारत आहे. केंद्राने कोरोनाकाळात राज्यातून 44 हजार कोटींचा महसूल वसूल केला आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करावे ही आमची मागणी आहे, असे ही यावेळी पवार म्हणाले.
पाटील राऊत यांच्या बोलण्याकडे माझं लक्ष नाही -
सध्या राज्यातील विकासकामे तसेच कशा पद्धतीने राज्याला पुढे नेता येईल, यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आरक्षण, निवडणुका अशी अनेक कामे माझ्यासमोर आहेत. चंद्रकांत पाटील राऊत कोण काय बोलत आहेत, हे मला खरच माहीत नाही. सध्या मी खूप कामात गुंतलो असल्याने त्यांच्या बोलण्याकडे माझं लक्ष नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.