महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime: धक्कादायक! दहशत निर्माण करण्यासाठी वानवडीमध्ये हवेत गोळीबार, कार्यालयावर हल्ला - वानवडीमध्ये हवेत गोळीबार

Pune Crime: पूर्व वैमनस्यातून राग मनात धरुन अतिक व इतर दुचाकीवरुन सय्यदनगर येथील गल्ली नं २२ मधील कार्यालयात आले़ होते. कार्यालयात कोणी नसताना, (Pune Police) त्यावर लाथांनी मारुन मुख्य रस्त्यावर येऊन अतिक याने हातात पिस्तुल घेऊन ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,’ असे बोलून पिस्तुलातून फायरिंग करुन दहशत निर्माण केली आहे.

Pune Crime
वानवडीमध्ये हवेत गोळीबार

By

Published : Dec 30, 2022, 2:37 PM IST

दहशत निर्माण करण्यासाठी वानवडीमध्ये हवेत गोळीबार

पुणे:पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणार्‍याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime) पुण्यामध्ये कोयता गॅंग हवेत गोळीबार करणाऱ्या या टोळ्या सध्या धुमाकूळ घालत असून, (shooting gun into ) त्यातच आता एक कार्यालयावर हातात बंदूक घेऊन तसेच (Pune Police) दहशत निर्माण करण्याचा (Attack on office) प्रयत्न करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केला:याप्रकरणी इंम्तियाज अफजल हुसेन शेख (वय ३७, रा. सय्यदनगर, हडपसर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५४०/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अतिक इक्बाल शेख (वय ३७, रा. सय्यदनगर, हडपसर), सादीक शेख (वय २५), हुसेन मुस्तफा कादरी यांच्यावर खूनाचा प्रयत्न व आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महंमदवाडी येथील जिल्हा प्रमुख शिव अल्पसंख्याक सेनाचे जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी रात्री साडेसहा वाजता घडला.

पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी:याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे ओळखीचे आहेत. फिर्यादीचा भाऊ इम्रान व सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात २७ डिसेंबरला भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन अतिक व इतर दुचाकीवरुन सय्यदनगर येथील गल्ली नं २२ मधील कार्यालयात आले़ कार्यालयात कोणी नसताना त्यावर लाथांनी मारुन मुख्य रस्त्यावर येऊन अतिक याने हातात पिस्तुल घेऊन ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,’ असे बोलून पिस्तुलातून फायरिंग करुन दहशत निर्माण केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदिप जनशिवले तपास करीत आहेत.

सिंहगड परिसरातील दोन गुन्हेगार: पुण्यामध्ये कालच कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सिंहगड परिसरातील दोन गुन्हेगारांना पोलिसांकडूनचोप देण्यात आला होता .काही दिवसापूर्वीच वारजे ब्रिज वरती हवेत गोळीबार करण्यात आला होता .त्यामुळे पुण्यात नेमकी दहशितेचे वातावरण निर्माण होण्याला कोण जबाबदार हाच प्रश्न खर आहे. नवीन पोलीस आयुक्त यावर काही निर्णय घेतात का ? नवीन काही योजना आखतात काही पाहण महत्त्वाचा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details