पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारने कोणतीही भरती प्रक्रिया रावबू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवस्मारक युवा संघर्ष समितीने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलने केली जात आहेत.
राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणतीही भरती करू नये. मराठा समाजातील तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. सरकारने मराठा तरुणांवर गुन्हा दाखल करू नये. तसेच शिवस्मारकाचे काम लवकरात-लवकर सुरू करावे अशा विविध मागण्या यावेळी शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्या.