महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivshahi Bus Accident : शिवशाही बसची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू, सात जण जखमी - शिवशाही बस आणि कंटेनरचा अपघात

उरुळी देवाची हद्दीत हडपसर - सासवड येथे मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली Shivshahi bus accident in Pune आहे. एक कंटेनर आणि शिवशाही बस यांमध्ये जोरदार धडक होऊन हा अपघात झाला Shivshahi bus collides with container आहे. या अपघातात एकजण जागीच ठार झाला One died in an accident असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Shivshahi bus
शिवशाही बस अपघात

By

Published : Sep 19, 2022, 9:32 AM IST

पुणे - उरुळी देवाची हद्दीत हडपसर - सासवड येथे मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली Shivshahi bus accident in Pune आहे. एक कंटेनर आणि शिवशाही बस यांमध्ये जोरदार धडक होऊन हा अपघात झाला Shivshahi bus collides with container आहे. या अपघातात एकजण जागीच ठार झाला One died in an accident असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मध्यराञी अपघात - रात्री साडे बारा वाजल्याच्या सुमारास सासवड रस्ता, ऊरळी देवाची, हॉटेल सोनाईजवळ शिवशाही बस आणि कंटेनरचा अपघात Shivshahi bus and container accident झाला. अपघात होऊन काही जण जखमी झाले. गाडीमधे अडकले असल्याची वर्दि अग्निशमन दलाला मिळाली असता तातडीने काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्रातील गाडी पाठवण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच शिवशाही बस MH14 GO 3104 (पंढरपुर-स्वारगेट) व कंटेनर MH18 AA 7190 यांचा मोठा अपघात झाला होता.

बस चालकाचे नियंत्रण सुटले - पुणे - सासवड रस्त्यावरील उरुळी फाट्यावर असलेल्या गोडाऊनमधून कंटेनर माल भरून निघाला होता. मात्र त्याचवेळी पुण्याच्या दिशेने जात असलेल्या शिवशाही एसटी बस वेगात होती. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस कंटेनरला जाऊन जोरात धडकली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. ही बस पंढरपूर हून पुण्याच्या दिशेने जात होती. या बसची धडक एवढ्या जोरात होती की बसचा पुढच्या भागचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. सात प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन गाडीतील जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कारण कंटेनर ररस्त्यात पूर्ण आडवा झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details