महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivshahi Bus Accident : पनवेल जवळ शिवशाही बसचा अपघात, एकाचा मृत्यू; 22 प्रवाशी जखमी - शिवशाही बस उलटली

पनवेलजवळ कर्नाळा खिंडीत शिवशाही बसला अपघात झाला आहे. अपघातात 22 प्रवासी जखमी झाले आहेत तर एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवशाही बस उलटली. कर्नाळा खिंडीत बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकून उजव्या बाजूला उलटली.

Shivshahi Bus Accident
Shivshahi Bus Accident

By

Published : Apr 25, 2023, 10:54 PM IST

नवी मुंबई :पनवेल जवळील कर्नाळा अभयारण्य परिसरात शिवशाही बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले आहेत, तर एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात:पनवेल एसटी आगरातून पनवेल महाड MH 09 EM 9282 क्रमांकाची शिवशाही बस दुपारी साडेतीनच्या सुमारास निघाली होती. मात्र, पनवेल परिसरात असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्या परिसरात येताच पनवेल-महाड शिवशाही बसवर असणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुले दुपारी 3:50 च्या दरम्यान ही बस डिव्हाडरला धडकून उलटी. या अपघातात 22 जण जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. बसला अपघात झाला त्यावेळी बसमध्ये चालक वाहकासोबत 40 प्रवासी प्रवास करीत होते.

एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू :या अपघाता 22 प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच असणाऱ्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर, गंभीर जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात झाला तेव्हा महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. तसेच जखमींना तात्काळ मदतीसाठी दोन रुग्णवाहिका पाठण्यात आल्या होत्या.

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत :रायगड : महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबत नाही. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खोपोली येथील शिंगरोबा मंदिराजवळ भरधाव वेगाने जाणारी खासगी बस दरीत कोसळली होती. ही बस मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. पहाटे चारच्या सुमारास प्रवासी झोपेत असतानाच हा अपघात झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बस अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले होते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि बचाव कार्यात सहभागी असलेल्या टीमशी बोलले संपर्क साधत माहिती घेतली होती. या प्रकणी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. जखमींवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपघातस्थळी भेट :अपघाताची माहिती समजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन अपघात स्थळाची पाहणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती देत या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली तसेच सर्व जखमींचा वैद्यकीय खर्च शासनाच्या निधीतून करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले होते.

हेही वाचा - Ravindra Dhangekar CM : आमदार रवींद्र धंगेकरांना व्हायचे मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटलांना दिले मोठे अव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details