पुणे - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले काम करत आहे. आपण त्यांच्याकडे एक बेरखान्या म्हणून पाहिले पाहिजे. विरोधीपक्ष काय बोलत आहे, ते काय टीका करत आहे, यावर दुर्लक्ष करा. कारण तो सुद्धा एक प्रकारचा ब्लॅक फंगसच आहे. आपण आपले काम करून आपण सकारात्मक रहा आणि मुख्यमंत्र्यांच्या दिशेने चला, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात एका कोविड केअर सेंटरचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
विरोधकांची टीका हे एक प्रकारचे ब्लॅक फंगस 'गंगेचं चित्र धक्कादायक आणि चिंताजनक' -
देशातील विविध राज्यात जे उपचार होत नाही ते महाराष्ट्रात आणि मुंबईत होत आहे. आज विविध राज्यातील रुग्ण मुंबईत येत आहे आणि इथे उपचार करून ते परत जात आहे. परत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत आहे. आज गंगेच जे चित्र दिसत आहे ते भयावह करणार आहे. गंगेच्या किनाऱ्यावर अनेक मृतदेह तरंगताना दिसत आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील हे चित्र आपण टाळू शकलो ते फक्त आपल्या नेतृत्वामुळेच आणि हे मान्य करावेच लागेल असल्याचे ते म्हणाले.
पुणेकरांना दिला सल्ला
आपण जी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे ती उत्तमरित्या सांभाळा आणि असेच काम करत रहा. काम करत असताना शिवसेना पक्षप्रमुखांनी जे मार्गदर्शन केले आहे, ते म्हणजे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी सुरूच असेल. पण आमचे राजकारण हे सामान्य माणसाशी केंद्रित आहे. ही शिकवण आहे तीच महाराष्ट्राची परंपरा आहे आणि आपण सर्वांनी पुण्यात जिथे जिथे शक्य होईल तिथे ही सेवा देत रहा, असा सल्ला यावेळी राऊत यांनी शिवसैनिकांना दिला.