पुणे - शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश पासलकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन दौंड तालुक्यात कृषी प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र करावे, ही मागणी केली आहे. तसेच शेतकरी आणि युवकांना कृषी प्रशिक्षण देण्यात यावे, अशीही मागणी यावेळी पासलकर यांनी केली आहे.
कृषी मंत्री दादा भुसेंची शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकरांनी घेतली भेट
दौंड तालुक्यातील शेतकर्यांच्या विविध प्रश्नांबाबत कृषीमंत्री दादा भुसे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी त्वरीत अहवाल मागवला आहे. तालुक्यातील सर्व शेतकरी उत्पादक गटाला सहाय्य करणार असल्याचे सांगितले.
दौंड तालुक्यात वाढत असलेली बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांची कोलमडलेली अर्थव्यवस्था या गोष्टी लक्षात घेता तालुक्यामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग तयार होणे आवश्यक आहे. युवकांना व शेतकऱ्यांना कृषी प्रशिक्षण मिळावे या मागणीसाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी भेट घेतली. यावेळी तालुक्यात कृषी प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र करावे ही मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे माऊली आहेर, प्रशांत जगताप उपस्थित होते.