महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय - IFFCO Tokyo Shiv Sena vandalism

कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रोडवर इफ्को टोकिओ कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात कामकाज सुरू होत असताना शिवसैनिक येथे घुसले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

तोडफोड करताना शिवसैनिक

By

Published : Nov 6, 2019, 1:24 PM IST

Updated : Nov 6, 2019, 3:00 PM IST

पुणे- पुण्यात आज शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रोडवर इफ्को टोकिओ कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात कामकाज सुरू होत असताना शिवसैनिक येथे घुसले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

प्रतिक्रिया देताना पुणे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावेत, या मागणीसाठी शिवसैनिकांकडून असे हिंसक आंदोलन करण्यात आले. यापूर्वी वेळोवेळी निवेदने देऊनही कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे, अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेनेने म्हटल आहे. तसेच, विमा कंपन्यांच्या विरोधात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा शिवसेनेने दिले आहे.

हेही वाचा-पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरूच, १ लाख ५० हजारांच्या दुचाकी चोरीला

Last Updated : Nov 6, 2019, 3:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details