पुणे- कोरोना साथीच्या प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या किल्ले शिवनेरी गडावरील दरवाजे पर्यटकांसाठी ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. याबाबत शिवनेरी गडावरील पहिला दरवाजा बंद करून आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनामुळे शिवनेरी गडाचे दरवाजे पर्यटकांसाठी ३१ मार्चपर्यंत बंद - corona latest news
किल्ले शिवनेरी गडावरील दरवाजे पर्यटकांसाठी ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत.
शिवनेरी गडाचे दरवाजे पर्यटकांसाठी ३१ मार्चपर्यंत बंद
शिवनेरी गडावर पर्यटकांची रोजच वरदळ असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शिवनेरी गडावर व शिवाई देवी मंदिर परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच रोडवर बँरेकेट लावण्यात आले आहेत.
दरम्यान राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊ नये यासाठीही उपाययोजना म्हणून नियमावली लावण्यात आली आहे.