पुणे- शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'एक वृक्ष स्वराज्यासाठी' या संकल्पनेतून शिवनेरी किल्ला ते रायगड किल्ला, अशा पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज या पालखीने शिवनेरी किल्लावरुन पारंपरिक वाद्य आणि सनईच्या सुरात रायगडाकडे प्रस्थान केले. शिवधनुष्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या या उपक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
एक वृक्ष स्वराज्यासाठी..! शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन
पालखीने शिवनेरी किल्लावरुन पारंपरिक वाद्य आणि सनईच्या सुरात रायगडाकडे प्रस्थान केले आहे. शिवधनुष्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या या उपक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
शिवनेरी ते रायगड किल्ला असा २३५ किमीचा प्रवास ही पालखी करणार आहे. पालखी मार्गावर शिवधनुष्य प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याशिवाय पालखीत सायकलस्वार सहभागी होणार आहेत. सायकलस्वारांच्या माध्यमातून 'प्रदूषणमुक्त भारत'चा संदेश देण्यात येणार आहे.
यंदा शिवराज्यभिषेकाचे ३४६ वे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित हा पालखी सोहळा २७ मे ते ६ जून असा राहणार आहे. पालखी सोहळ्याचे हे ६ वे वर्ष असून पालखीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात येणार आहेत.