पुणे - शिरूर लोकसभा मतदार संघात काल (२३ मे) झालेल्या निर्णायक मतमोजणीनंतर कॉग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. गेल्या १५ वर्षापासून या मतदार संघात आढळराव पाटील यांचे वर्चस्व होते. मात्र, त्यांना क्लिन बोल्ड करत डॉ. अमोल कोल्हेंनी बाजी मारली. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. त्यांच्या आनंदात सहभागी होऊन शिवाजीरावांनीही त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.
शिरूर लोकसभा: डॉ. अमोल कोल्हेंना आढळराव पाटलांच्या सोशल मीडियावर शुभेच्छा - election
या निवडणूकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा ६३ हजार मतांनी पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघात ५९.७२ टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत याच मतदारसंघात ६४.५४ टक्के मतदान झाले आहे. यामुळे वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने असणार याबद्दल सुरुवातीपासूनच उत्सुकता होती.
शिरूर लोकसभा: डॉ. अमोल कोल्हेंना आढळराव पाटलांच्या सोशल मीडियावर शुभेच्छा
या निवडणूकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा ६३ हजार मतांनी पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघात ५९.७२ टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत याच मतदारसंघात ६४.५४ टक्के मतदान झाले आहे. यामुळे वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने असणार याबद्दल सुरुवातीपासूनच उत्सुकता होती.
दरम्यान लोकसभेच्या मैदानाच्या आखाड्यात पराभवानंतरही मनाचा मोठेपणा दाखवुन आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हेंना फेसबुकवर पोस्ट टाकुन शुभेच्छा दिल्या आहेत.