पुणे -सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवत असताना त्याचा परिणाम निवडणुकीच्या प्रचारावर होताना दिसत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे गुरुवारी जुन्नर दौऱ्यावर आले होते. उन्हाच्या कडाक्यामध्ये हा दौरा सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
शिवभूमीत कडाक्याच्या उन्हात शिवाजी आढळराव पाटलांचा प्रचारदौरा - election
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे गुरुवारी जुन्नर दौऱ्यावर आले होते. उन्हाच्या कडाक्यामध्ये हा दौरा सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
कडाक्याच्या उन्हात शिवाजी आढळराव पाटलांनी गावांना भेट दिली.
अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या ओझर येथे गणपतीला अभिषेक करून आढळराव पाटील यांनी जुन्नर तालुक्यातील पंधरा ते सोळा गावांचा दौरा केला. तसेच मनसेतून शिवसेनेमध्ये आलेले आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामदैवत यांचे दर्शन घेत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रचारादरम्यान कडाक्याच्या उन्हाचा फटका राजकीय नेत्यांना बसत होता.