पुणे - आज किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे शिवनेरी नगरीत शिवजन्मोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. सकाळी ७ वाजता किल्ले शिवनेरीवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते शिवाईदेवीची शासकिय पूजा करण्यात आली.
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाला सुरुवात - Shivneri
आज किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे शिवनेरी नगरीत शिवजन्मोत्सवाचा जल्लोष सुरु आहे.
shivneri
सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी काल रात्रीपासून शिवनेरीवर दाखल झाले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातन संपूर्ण परिसरावर ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे.