पुणे- किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे शिवनेरी नगरीत शिवजन्मोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातून शिवप्रेमी किल्ले शिवनेरी गडावर दाखल आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजी आढळराव पाटील, विनायक मेटे उपस्थित होते.
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा; ढोल लेझीमच्या तालावर तरुणांनी धरला ताल - celebration
किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे शिवनेरी नगरीत शिवजन्मोत्सवाचा जल्लोष सुरु आहे.
![किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा; ढोल लेझीमच्या तालावर तरुणांनी धरला ताल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2487892-308-aa4e1e0a-e0ee-41bd-bf26-367f97a633a1.jpg)
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा
यावेळी बाल शिवबाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आदिवासी बांधवांनी ढोल लेझीमच्या तालावर विविध संगीतातून ताल धरला. आदिवासी पाड्यात पूर्वीच्या काळात, अशा पद्धतीने जन्मोत्सवावेळी विविध कार्यक्रम केले जात होते, तीच संकल्पना आजही शिवनेरी गडावर सुरू आहे.