पुणे : आक्रमक झालेल्या शिवभक्तांकडून जोरदार घोषणाबाजी करत मुख्य कार्यक्रम थांबविण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या या कारभारावर माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे देखील आक्रमक झाले होते. मुख्य कार्यक्रम काही वेळ थांबविण्यात आले होते. यावेळी माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काही मागण्या केल्या आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, शासकीय कार्यक्रम जो होतो, त्या कार्यक्रमाला सामान्य शिवभक्तांना अडवले जाते.
कोणत्याही शिवसैनिकांची अडवणूक होणार नाही : प्रशासन व्हीआयपी पास कोणकोणत्या लोकांना देत असते? हे व्हीआयपी कोणाच्या म्हणण्यानुसार दिले जातात? सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि व्हीआयपी लोकांना एक न्याय दिला जातो. हे चुकीचे आहे. तसेच शासकीय कार्यक्रमाला जेव्हा मंत्री हेलिपॅडने येतात तेव्हा खूप वेळ शिवभक्तांना थांबविले जाते. हे देखील थांबविले पाहिजे, अश्या मागण्या यावेळी राजे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण दिलेल्या सूचनांचा आम्ही नक्कीच विचार करणार आहे. पुढील वर्षी कोणत्याही शिवसैनिकांची अडवणूक होणार नाही. सर्वांना न्याय हे दिला जाणार आहे. असे देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हजारो शिवभक्तांचे घोषणा बाजी केली. भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात न आल्याने शिवभक्त आक्रमक झाले होते.