पुणे; पेट्रोल - डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन - शिवसेना आंदोलन
पेट्रोल डिझेलचे दर शतकी वाटचाल करत असताना केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवरच्या अबकारी कर सावलतीची अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलवरच्या सहकारी करात मोठी कपात करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
![पुणे; पेट्रोल - डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन पुणे; पेट्रोल - डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10512941-60-10512941-1612528666135.jpg)
पुणे; पेट्रोल - डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन
पुणे- दररोज वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेच्यावतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यातील झाशीच्या राणी पुतळ्याजवळ शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बैलगाडीची प्रतिकात्मक रुग्णवाहिका बनवण्यात आली होती. यावेळी केंद्रातील सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पुणे; पेट्रोल - डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन
Last Updated : Feb 5, 2021, 7:18 PM IST