महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा.. महिला शिवसैनिकांनी अमृता फडणवीसांच्या फोटोला मारले जोडे - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून पिंपरी चिंचवड येथील महिला शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन केले.

निषेध करताना महिला शिवसैनिक
निषेध करताना महिला शिवसैनिक

By

Published : Dec 23, 2019, 11:48 PM IST

Updated : Dec 23, 2019, 11:58 PM IST

पुणे- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून बोचरी टीका केली होती. याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्र उमटत असून पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडी यांनी अमृता फडणवीस यांच्या फलकावरील प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे.

आंदोलन करताना महिला शिवसैनिक

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीस यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे आणि चप्पल मारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या ट्विटचा निषेध केला आहे. यावेळी अमृत फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. देवेंद्र फडणवीसांच्या ट्विट प्रतिक्रिया देताना अमृता यांनी, 'केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही, त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागत, एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते, असे ट्विट करत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टॅग देखील केलं होतं.

Last Updated : Dec 23, 2019, 11:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details