महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shiv Sena leader Sanjay Raut : संजय राऊतांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी - संजय राऊतांची पत्रकार परिषद

शिवसेनेचे नेते संजय राऊत हे त्यांच्या भाषण शैलीमुळे ओळखले जातात, अनेकदा भाषणात गुगली टाकून विरोधकांना आऊट करण्याचं काम ते हमखास करत असतात. पंरतु आता संजय राऊत यांनी क्रिकेटच्या मैदानात ( Sanjay Raut in cricket ground ) उतरून फलंदाजी करताना चांगलीच फटकेबाजी केलीय.

Sanjay Raut
Sanjay Raut

By

Published : May 10, 2022, 5:00 PM IST

पिंपरी-चिंचवड: शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) हे त्यांच्या भाषण शैलीमुळे ओळखले जातात, अनेकदा भाषणात गुगली टाकून विरोधकांना आऊट करण्याचं काम ते हमखास करत असतात. पंरतु आता संजय राऊत यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरून फलंदाजी करताना चांगलीच फटकेबाजी केलीय. पुण्याच्या खेड, आंबेगाव तालुक्यात माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील ( Former MP Shivaji Adhalrao Patil ) यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला त्यांनी हजेरी लावली ( Sanjay Raut Attend cricket tournament ) होती. तेव्हा, त्यांनी फलंदाजी करत काही फटके लागावले.

संजय राऊतांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी



त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले ( Sanjay Raut Press conference ) की, मी ऑलराऊंडर आहे, मी मुंबईचा आहे. पण आजतागायत मी क्रिकेटच्या मैदानात कधीच उतरलो नाही, क्रिकेटची मॅच सुद्धा कधी पाहिली नाही. पण मी मैदानात उतरलो की बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, पंचगिरी सर्व काही करू शकतो. अस त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. पत्रकार परिषद संपताच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला भेट देऊन संजय राऊत थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले. तिथं त्यांनी बॅटिंग करत फटकेबाजी केली, कार्यकर्ते आणि प्रेक्षकांची मने जिंकली.

हेही वाचा -Two Robbers Recaptured : औंध पोलिसांचे लाॅकअप फोडून पळालेले ५ पैकी दोन दरोडेखोर पुन्हा ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details