पुणे- हाथरस येथे मुलीवर अत्याचार करून तिला मारण्यात आले. कुटुंबाच्या परवानगीशिवाय रात्रीच्या वेळी पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पीडितेच्या कुटुंबावर २० दिवस अत्याचार करण्यात आले. या घटनेचा निषेध आणि हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पुण्यातील खंडोजी बाबा चौक येथे शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळिमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसत आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हाव्ही. तो पर्यंत आरोपींना तुरुंगातच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.