महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील 'आर डेक्कन' या राणेंच्या मॉलवर दगडफेक, गुडलक चौकात कोंबड्यांसह शिवसैनिकाचे आंदोलन - पुणे शिवसेना बातमी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक झाली असून पुण्यातील गुडलक चौकात शिवसैनिकांनी आंदोलन केले. तर आर डेक्कन या नारायण राणे यांच्या मॉलवर दगडफेक केली आहे. या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

आंदोलक
आंदोलक

By

Published : Aug 24, 2021, 3:18 PM IST

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) एका पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. 24 ऑगस्ट) गुडलक चौकात कोंबड्यांसह शिवसैनिकांनी आंदोलन केले. तसेच पुण्यातील आर डेक्कन या नारायण राणे यांच्या मॉलवर शिवसैनिकांनी दगडफेक केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आज शहरात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे. पुण्यातील गुडलक चौकात संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या निषेधार्थ कोंबड्यांसह आंदोलन केले. तसेच पुण्यात सचेत मध्यवर्ती ठिकाणी आर डेक्कन मॉलवर त्यांनी दगडफेकही केली आहे.

शिवसैनिकांचा संताप लक्षात घेता पुणे पोलिसांनी भाजप शहर कार्यालयाच्या बाहेर कडक बंदोबस्त केला आहे. तरी काही संतप्त शिवसैनिकांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी गुडलक चौकात नारायण राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन केले.

हेही वाचा -नारायण राणेंना भाजपचा पूर्ण पाठिंबा - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details