पुणे-पुढील वर्षांपासून राज्यातील सर्व महाविद्यालयात शिवजयंती हा दिवस 'स्वराज्यदिन' म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. सामंत यांनी शिवजयंती निमित्त लाल महालला भेट देत माँ जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
आता राज्यातील महाविद्यालयात शिवजयंती 'स्वराज्यदिन' म्हणून होणार साजरा - उदय सामंत शिवजयंती न्यूज
महाराष्ट्रात महिलांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत यासंबंधीची योग्य ती काळजी महाविकास आघाडीचे सरकार घेत आहे. यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः अभ्यास करून दिशा कायदा महाराष्ट्रात आणला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर या महाराष्ट्रात महिलांचे संरक्षण चांगल्या प्रकारे होईल असा दावाही सामंत यांनी केला.
शिवजयंतीच्या दिवशी स्वराज्यदिन साजरा
ज्या शिवरायांनी देशाला आणि महाराष्ट्राला घडवले त्या छत्रपती शिवरायांच्या चरणी वंदन करण्याची संधी मला पुण्यात मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. आज शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी जाहीर करतो की, पुढील वर्षांपासून माझ्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात शिवजयंती हा दिवस 'स्वराज्यदिन' म्हणून साजरा केला जाईल. येत्या आठ दिवसात याबाबत परिपत्रकही काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांचे संरक्षण करण्यासाठी आघाडी सरकार कटीबद्ध
महाराष्ट्रात महिलांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत यासंबंधीची योग्य ती काळजी महाविकास आघाडीचे सरकार घेत आहे. यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः अभ्यास करून दिशा कायदा महाराष्ट्रात आणला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर या महाराष्ट्रात महिलांचे संरक्षण चांगल्या प्रकारे होईल असा दावाही त्यांनी केला.
छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेविषयी बोलण्यास नकार
राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी शिवजयंतीनिमित्त रायगडावर पुरातत्व खात्यातर्फे करण्यात आलेल्या विद्युत रोशनाईविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्याविषयी विचारले असता उदय सामंत म्हणाले आज शिवजयंतीचा दिवस आहे, छत्रपती शिवरायांना वंदन करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या विषयावर बोलणे उचित ठरणार नसल्याचे सामंत म्हणाले.