महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरूर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान जप्त केल्या 1 कोटी रक्कमेच्या जुन्या नोटा - नोटा

शिरूर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एका कारमधून 1 कोटी 26 हजाराच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत.

शिरूर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान जप्त केल्या 1 कोटी रक्कमेच्या जुन्या नोटा

By

Published : Jun 12, 2019, 5:14 PM IST

पुणे- शिरूर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एका कारमधून 1 कोटी 26 हजाराच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. ही कारवाई 7 जूनच्या मध्यरात्री करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. तर एकजण फरार आहे.

शिरूर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान जप्त केल्या 1 कोटी रक्कमेच्या जुन्या नोटा

पोलिसांनी जप्त केलेल्या जुन्या नोटा पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या आहेत. नोटबंदीच्या काळात या नोटा बदलण्यासाठी पुण्यातील एका महाविद्यालयीन तरुणाला देण्यात आल्या होत्या. परंतु त्या बदलता न आल्यामुळे हा तरुण जुन्या नोटा घेऊन पुण्याच्या दिशेने येत होता. नाकाबंदीदरम्यान शिरूर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या गाडीची झडती घेतली असता, या नोटा आढळून आल्या.

शिरूर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान जप्त केल्या 1 कोटी रक्कमेच्या जुन्या नोटा

याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या प्रकरणाची आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पुढील तपास आयकर विभागाचे अधिकारी करणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details