महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरुरमध्ये अवैध वाळू उपसा; महसूल विभागाच्या कारवाईत 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

शिरुर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून घोडनदी आणि भीमानदी पात्रात विनापरवाना खोलवर जाऊन वाळू उपसा केला जात होता. आता या दोन्ही नद्यांमध्ये होत असलेल्या विनापरवाना वाळू उपशावर कारवाई होत असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभागची कारवाई
अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभागची कारवाई

By

Published : Dec 5, 2019, 8:13 AM IST

पुणे- शिरुर तालुक्यातील तरडेवाडी येथे घोडनदी पात्रात वाळू उपशाची कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वाळू उपसा केला जात होता. या अड्डयावर महसूल विभाग आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये बोटींसह ३ कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करत करण्यात आला आहे. याप्रकरणी शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभागची कारवाई

शिरुर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून घोडनदी आणि भीमानदी पात्रात विनापरवाना खोलवर जाऊन वाळू उपसा केला जात होता. आता या दोन्ही नद्यांमध्ये होत असलेल्या विनापरवाना वाळू उपशावर कारवाई होत असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. यापुढे नदीपात्रात वाळू उपसा केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना आणि शिरुर तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details