शिरूर (पुणे) - जिल्ह्यातील शिरुर पोलीस स्थानकात एका महिलेने सासरच्यांनी छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पती विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच, त्याच पिडीत महिलेने पुन्हा दिलेल्या तक्रारीवरून त्याच आरोपी विरोधात पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराचा गून्हा दाखल करण्यात आला. एकाच व्यक्ति विरोधात, तोच गुन्हा परत दाखल केल्यामुळे शिरूर पोलिसांच्या या अजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुढील सुनावणी 21 सप्टेंबर 2021 रोजी
9 डिसेंबर 2019 रोजी शिरूर पोलीस ठाण्यात एका महिलेनी तिची सासू व पती विरोधात दिलेल्या तक्रारीवरून 0837/2019 क्रमांकाचा सीआर नंबर दाखल करण्यात आला होता. यावेळी महिलेला तिच्या मुलीसोबत घरातून हाकलून दिल्यानंतर पती, सासू विरोधात कौटुंबिक हिंसाचार, मारहाण व धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हा खटला सध्या शिरूर पोलीस ठाण्यात प्रलंबीत असून यामध्ये आतापर्यंत 9 जुलै 2020, 15 डिसेंबर 2020 आणि 22 एप्रिल 2021 ला सुनावणी झाली आहे. तर पुढील सुनावणी 21 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.
पोलिसांचा अजब कारभार