पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट शिवसेनेत ( Two Groups in Shiv Sena at Maharashtra ) झाले आहे. या दोन्ही गटांत ( Two Groups in Shiv Sena at Maharashtra ) दररोज आरोप-प्रत्यारोप होत असून, यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. असे असताना, अनेकांना वाटत आहे की, हे दोन्ही गट एकत्र यावेत. मात्र, एका लग्नपत्रिकेने हे जमवून आणले ( Shinde and Thackeray Marriage is a Hot Topic ) आहे. त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पाहायला ( Shinde and Thackerayis Topic of Social Media ) मिळत आहे. पाहूयात नेमके काय घडले आहे.
जुन्नर तालुक्यातील एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यात शिंदे आणि ठाकरे यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. या पत्रिकेने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव सहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख व सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल व आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या चि. सौ. का. अनुराधा यांचा शुभविवाह दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे.