महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्रापूर पोलिसांचा जुगार अड्यावर छापा, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल - Shikrapur police news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असताना जुगार खेळणाऱ्या 15 जणांविरोधात शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 17 लाख 85 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिक्रापूर पोलीस ठाणे
शिक्रापूर पोलीस ठाणे

By

Published : May 24, 2021, 5:31 PM IST

पुणे (शिक्रापूर) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा स्थितीतही सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिासंनी 15 जणांविरोधात कारवाई केली असून तब्बल 17 लाख 85 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी (दि. 23 मे) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक भालेकर यांना फुटानवाडी गावातील एका शेतात युवराज सुदाम बगाटे, प्रवीण सुदाम बगाटे व सुदाम हरिशेठ बगाटे हे जुगार अड्डा चालवत असून या ठिकाणी काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी अनेक जण या ठिकाणी विना मास्क जुगार खेळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी पवन किसन वाळुंज (रा. फाकटे ता. शिरूर), नवनाथ नामदेव घोलप (रा. गोससी ता. खेड), अतुल लक्षुमन कानडे (रा. कानेरसर ता. खेड), विजय शिंदे (रा. अवसरी ता. आंबेगाव), योगेश निश्चित (रा. वाडणेर, ता. शिरूर), संतोष गाडेकर (रा. अवसरी, ता. आंबेगाव), सचिन चैधरी (रा. एकतानागर, ता. खेड), संभाजी बांगर (रा. वाकलवाडी, ता. खेड), अमोल खेडकर (रा. धमारी, ता. शिरूर), अनिल पवार (रा. कानेरसर. ता. खेड), संतोष हजारे, संदीप शिंदे (दोघे रा. अवसरी बु. ता. आंबेगाव), सोमनाथ चासकर (रा. चाकण, ता. खेड), प्रवीण बगाटे (रा. फुटानवाडी, ता. शिरूर), युवराज सुदाम बगाटे, सुदाम हरिशेठ बगाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील युवराज सुदाम बगाटे, सुदाम हरिशेठ बगाटे यांनी पोलिसांनी छापा टाकताच घटनास्थळावरुन पळ काढला.

हेही वाचा -ब्लाऊजने गळा आवळून सुनेने केला सासूचा खून, मृतदेह झाडीत फेकताना सीसीटीव्हीत कैद

ABOUT THE AUTHOR

...view details