पुणे - निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळी दौऱ्यावर गेले आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आज त्यांनी इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे आणि कौठळी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर उपस्थित होते.
निवडणुकीचे निकाल लागताच पवार दुष्काळी दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी साधला संवाद - ncp
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळी दौऱ्यावर गेले आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आज त्यांनी इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे आणि कौठळी गावाला भेट दिली.
या दुष्काळी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या समस्या शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. गैरसुविधा व समस्यांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शनिवारी शरद पवार यांनी साताऱ्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ, मोळ, मांजरवाडी येथेही शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांना या दुष्काळी परिस्थितीशी लढण्यासाठी ज्या आवश्यकता आहे त्या समजून घेऊन आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला ४ जागा तर काँग्रेसला केवळ १ जागा जिंकता आली. मात्र, या पराभवाने खचून न जाता शरद पवारांनी लगेच दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचे काम सुरु केले आहे.