देशात असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा- शरद पवार पुणे : देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची आज बैठक पाटण्यामध्ये होत आहे. या बैठकीला देशभरातील विरोधी पक्षातील प्रमुख नेते हे उपस्थित राहणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहे. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, आज बैठकीत नेमके काय होईल? हे आज सांगता येणार नाही. बैठकीत साधारणतः देशात असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
ज्या ठिकाणी भाजपाचे राज्य नाही, त्या ठिकाणी दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, अशी परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. ते विषय कसे हाताळावे, यासाठी आजची बैठक- शरद पवार
देशात असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा : देशाच्या काही राज्यांमध्ये, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करण्याचे कृत्य होत आहे. ते विशेष नॉन बीजेपी राज्यात हे जास्त होत आहे. त्यामुळे यामागे कोणाचा हात आहे, हे स्पष्ट होत आहे. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. या सगळ्या गोष्टींवर एकत्रित विचार करून पुढची लाईन ठरवावी, एवढाच या बैठकीचा विषय आहे. असे यावेळी पवार म्हणाले. या बैठकीत इतर राज्यातले नेते देखील त्यांचे मुद्दे उपस्थित करतील. काँग्रेस पक्ष देखील या बैठकीला उपस्थित असणार आहे.
मोदी यांच्या विरोधात सक्षम उमेदवार :गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच ज्या ठिकाणी भाजपाचे राज्य नाही, त्या ठिकाणी अशी परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. ते विषय कसे हाताळावे, यासाठी आजची बैठक असल्याचे शरद पवार यांनी म्हटलेले आहे. परंतु या बैठकीत भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभे करणे, लोकसभेत अतिशय चांगल्या ताकतीने लढणे, हा विषय महत्त्वाचा असणार असल्याचा समजला जात आहे.
उद्धव ठाकरे पाटण्याच्या दिशेने रवाना- ईडीने ठाकरे यांच्या निकटवर्तींच्या घरावर मुंबईत छापे टाकले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे त्यांच्या सुरक्षा ताफ्यात कपात केली आहे. अशा परिस्थितीत ठाकरे गटाकडून भाजपबाबत आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. ते आज मुंबईतून पाटण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
हेही वाचा :
- Opposition Parties Meeting Patna : पाटणात विरोधी पक्षांची बैठक; शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
- Sadabhau Khot Criticized: शिंदे गटाला गद्दार म्हणून संबोधने हे महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक - सदाभाऊ खोत यांची टीका
- Sharad Pawar Threat Case : शरद पवार धमकी प्रकरणी आठवडभरानंतर सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर