पुणे- राज्य सरकार कामगाराच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पहात नाही. आज कामगार असहाय्य झाले आहेत. तरी देखील कामगार आज समंजसपणाने वागत आहेत. परंतु, सरकार त्यांच्यांकडे दुर्लक्ष करत आहे, अशा वेळी कामगारांचा संयम सुटला तर त्यांना दोष देता येणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात व्यक्त केले.
कामगारांचा संयम सुटला तर त्यांचा दोष नाही - शरद पवार - workers movement
राज्य सरकार कामगाराच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पहात नाही. आज कामगार असहाय्य झाले आहेत. तरी देखील कामगार आज समंजसपणाने वागत आहेत.
साखर कामगार संघटना, शिक्षक संघटना, एसटी कामगार संघटना याच्यासह अनेक संघटित कामगार संघटना सध्या प्रचंड नैराश्यात असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी संघाच्या वतीने साखर कामगारांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. सध्या एका बाजुला कारखान्यांचा तर दुसरीकडे साखर कामगारांच्या जीवन मरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या पुढाकाराने यातून मार्ग काढावा, असे ते म्हणाले.
देशात बहुसंख्य कारखान्यांची थकबाकी आहे. साखर व्यवसाय सध्या अडचणीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने यातून मार्ग काढण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.