बारामती (पुणे) -कृषी कायद्यासंदर्भात प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत. तशी स्थिती देशाच्या संसदेची झाले आहे. केंद्र सरकारने निर्णय न घेल्यास सोमवारी याचे तीव्र पडसाद संसदेत उमटतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
'शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्राने निर्णय न घेतल्यास सोमवारी संसदेत तीव्र पडसाद उमटतील' तर सोमवारीदेखील याचे पडसाद उमटतील -
शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. दिल्लीच्या चार सीमांवरही शेतकऱ्यांचा वेढा आजही कायम आहे. थंडीवाऱ्यातही शेतकऱ्यांचे तीव्र स्वरूपात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आत्तापर्यंत जवळपास दोनशे शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. देशाचा अन्नदाता इतक्या प्रदीर्घ काळासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्यपणाची भूमिका घेतलेली नाही. जशी कृषी कायद्यासंदर्भाच्या प्रश्नांवर शेतकरी अस्वस्थ आहेत, तशीच स्थिती संसदेचीही झाली आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास संसदेचे दोन्ही सभागृह विरोधकांनी बंद पाडली होती. सोमवारीदेखील याचे पडसाद उमटतील, असा इशारा पवार यांनी दिला.
हेही वाचा - विश्वविक्रमी मिसळ! सात तासात तयार केली सात हजार किलो मिसळ