राकॉंच्या आश्वासक चेहऱ्याबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया पुणे:आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी अजित पवार यांनी हीच पक्षाची भूमिका असल्याचे सांगत पक्षावर दावा दाखल केला आहे. (Sharad Pawar On NCP Face) याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की कोणी काही दावा करावा मला लोकांवर विश्वास आहे. (Ajit Pawar comes to power) ज्यांना इतिहास माहिती नाही, त्या राष्ट्रवादीमध्ये आला कसे?.कोणी काही दावा करो आम्ही लोकांचा पाठिंबा घेऊ आणि मला खात्री आहे की लोकं आम्हाला पाठिंबा देतील, असे देखील यावेळी शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar PC Pune) तसेच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा शुक्रवारी दिला हे तुमच्या कडूनच कळत आहे. त्यांनी विधानसभा राजीनामा दिला असेल तर माहीत नाही. तसेच पक्षाचे नाव घेऊन कोणी भांडण करत असेल तर आम्ही भांडणार नाही, आम्ही लोकांच्या जवळ जाऊ, असे देखील यावेळी शरद पवार म्हणाले.
संख्याबळाविषयी सांगू शकत नाही:आमदारांच्या संख्याबळ बाबत पवार म्हणाले की, संख्याबळ आहे का, हे मी आता सांगू शकत नाही. विरोधी पक्षनेते यांची निवड करण्याचा अधिकार अध्यक्ष्यांचा आहे. २, ३ दिवसात आम्ही बघू की, काँग्रेस किंवा सेना किंवा राष्ट्रवादी विरोधी पक्षनेता म्हणून कोण नेता द्यायचा, त्यानंतर ठरवून आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे मांडू असे देखील यावेळी पवार म्हणाले.
आमदारांवर काय करणार कारवाई :आमदारांच्या कारवाई बाबत पवार म्हणाले की ,आमदार यांच्यावर काय कारवाई करायची हे पक्षातील नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. मी पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक केली होती. तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी जी पाऊले त्यांनी टाकायला पाहिजे होती ती टाकली नाहीत, हे योग्य नाही. माझा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. ज्यांनी शपथ घेतली, त्यांच्यावर कारवाईचा विचार करण्यात येईल, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
त्यांच्या भविष्याची काळजी :पक्ष फुटला घर फुटले असे वाटत का? याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्ष फुटला घर फुटले असे अजिबात वाटत नाही. कारण प्रश्न घरचा नाही जनतेचा आहे आणि आता पक्ष वाढवणार आहे. राज्यातील जनतेच्या समोर जाणार आहे. मला आता जे गेले आहेत, त्यांच्या भविष्याची काळजी आहे. आम्ही कोणाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. ज्यांच्या सह्या घेतल्या ते लोकं संपर्क साधत आहेत. त्यांना मतदार संघाची आणि कार्यकर्त्यांची चिंता आहे. सत्तेचा फायदा होईल, पण यातून १०० टक्के यश मिळते असे नाही. शेवटी पाठिंबा जनता देते, असे देखील यावेळी पवार म्हणाले. तसेच मी राजीनामा परत घेतलेला निर्णय बरोबरच होता असे वाटत आहे, असे देखील यावेळी शरद पवार म्हणाले.
हेही वाचा:
- Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री! अजित पवारांनी घेतली 3 वर्षांत तिसऱ्यांदा शपथ
- Maharashtra Political Crisis : राज्यसभेत 'एनडीए' अधिक मजबूत; लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती तयार
- Maharashtra Political Crisis : 'केंद्रीय यंत्रणांची भिती दाखवून..', नाना पटोलेंचा भाजपवर मोठा आरोप