पुणे - भाजपने एक जुना व्हिडिओ ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा ( Bjp Tweet Video And Allegation Sharad Pawar ) साधला आहे. या व्हिडिओत शरद पवार कवी जवाहर राठोड यांची एक कविता म्हणत आहेत. त्यावरुन पवार हे हिंदुत्वविरोधी आहे, अशी टीका केली भाजपने केली ( bjp Allegation Sharad Pawar ) आहे. त्यानंतर आता शरद पवारांनी भाजपला प्रत्युत्तर देत पुन्हा ती कविता वाचली ( sharad Pawar Reply Bjp ) आहे. आम्ही पाथरवट या कवितेत कष्टकऱ्यांच्या वेदना आहेत. त्याचा कोणी गैरप्रसार करत असेल तर त्यांनी आवश्य करावा, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. ते पुरंदर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
'राज्यघटना ही आपली जमेची बाजू' - भारताची देखील श्रीलंकेसारखी अवस्था होईल का, असे शरद पवारांनी पत्रकारांनी विचारले. तेव्हा पवार यांनी म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना भारताची जमेची बाजू आहे. त्या घटनेमुळे आपण स्वतंत्र झालो आहोत. घटनेने देशाला एकसंघ ठेवले. श्रीलंका-पाकिस्तानमध्ये सारखीच स्थिती आहे. संविधानाची चौकट या देशांच्या आजूबाजूला नसल्याने तेथील लोकशाही संकटात जाते. मात्र, आपल्याकडे राजकारण्यांपेक्षा सामान्य लोक शहाणा असल्याचे म्हणत पवारांनी इंदिरा गांधी यांचे उदाहरण दिले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीचा निर्णय घेतल्यानंतर लोकशाहीवर संकट आल्याचे लोकांना वाटले आणि लोकांनी त्यांचाही पराभव केला. तसेच, पुढच्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांच्या हातात सत्ता दिली. आपल्या देशातील लोक राजकारण्यांपेक्षा शहाणी आहेत. राजकारण्यांचे चुकले तर अक्कल शिकवतात आणि दुसऱ्याला संधी देतात, अस यावेळी पवार म्हणाले.
'नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था संकटात' -भाजपला सत्तेत येऊन 8 वर्षे झाली त्याबद्दल शरद पवार यांनी सांगितले की, देशात प्रचंड आर्थिक संकट आहे. नोटबंदीने काय झालं? नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था केवळ संकटात आली. त्याने अशाप्रकारचे अनेक निर्णय घेतले. त्या निर्णयांमध्ये लोकांना सहभागी करायचे असते ते केलेले नाही. कोरोना काळात यांनी एकदा सांगितले सगळ्यांनी थाळी वाजवा. लोकांनी थाळ्या वाजवल्या कारण त्यांच्यावर संकट होतं. अशी अनेक संकटे आली त्यात लोकांना सामावून घेतले नाही.
'छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्च होते' -छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे या देशातील लोकांचे प्रेरणास्थान आहे. कुठल्याही संकटाच्या काळात धैर्याने तोंड द्यायचा असेल, तर कोणाचा तरी राजाश्रय लागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्च होते. त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज संकाटापुढे धैर्याने उभे राहिले. त्यामुळे वास्तव्य चित्र तरुणांना समोर उभ राहण्याची गरज आहे. राज्य सरकारने इतर किल्ल्याप्रमाणे पुरंदर कडे लक्ष द्यावे. प्रत्येक किल्ल्याला इतिहास आहे. परंतु, तो योग्य इतिहास योग्य पद्धतीने मांडला पाहिजे. दुर्दैवाने इतिहासाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. सर्वसामान्य लोकांची ऐतिहासिक भावना उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. सुदैवाने पुरंदर किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे. माझ्याकडून राज्य सरकारला विनंती केली जाईल की, इतर किल्ल्याप्रमाणे पुरंदर कडे लक्ष द्यावं, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.