पुणेSharad Pawar On Viral Caste Certificate:मागील दोन दिवसांपासून शरद पवार ओबीसी समुदायातील असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चेला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं एक जात प्रमाणपत्र कारणीभूत ठरलंय. हे जात प्रमाणपत्र शरद पवारांचं असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आरक्षण प्रश्न आता केंद्र सरकारचा झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रश्न मांडले आहेत. मराठा आरक्षणाबद्दल तरुणांची भावना तीव्र झाली आहे. यात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारचा आहे. काही लोकांनी माझा दाखला बनवला आहे. मात्र सगळ्या जगाला माहिती आहे की, माझी जात कुठली आहे. मी कधीही जातीवाद केला नाही. - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
पाडव्याला राज्यातील लोक बारामती मध्ये येतात : गेल्या 50 वर्षापासून पाडव्याला राज्यातील लोक बारामतीमध्ये येतात. आता लोक 2 दिवस आधी येतात. पाडव्याला गर्दी (Diwali Padwa 2023) असते, म्हणून आम्ही लवकर येतो. मी आज सकाळी 6.30 पासून हजारो लोकांना भेटलो आहे. मराठवाडा, पुणे शहर, मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामधून लोक भेटले. ही दिवाळी आणि नवीन वर्ष देशातील सर्व सामान्य माणसांना सुखाचं आणि समृद्धीचं जावं. ७० टक्के हे लोकं तरुण आहेत आणि ते मला भेटायला येतात त्यात मला आनंद आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.