महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाईल अशी अपेक्षा होती' - शरद पवार

शनिवारी (दि. 1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केले. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार
शरद पवार

By

Published : Feb 2, 2020, 3:33 PM IST

पुणे- काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावर मी समाधानी नाही. या अर्थसंकल्पात गुंतवणूकीला प्रोत्साहन दिले जाईल, अशी अपेक्षा होती. ज्यामुळे गुंतवणूक क्षेत्रात बदल होतील अशी अपेक्षा होती. पण, असे काही झाले नाही, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली.

बोलताना शरद पवार

या अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला महत्त्व दिले असे म्हणत असले तर तेही खरे नाही. अर्थसंकल्पात सिंचनसाठी तरतूद केलेला आकडा बघितला आणि सध्या देशाची सबंध गरज बघितली तर, यात जमीन अस्मानाचा फरक दिसून येईल. तरुण वर्गात असलेली बेरीजगारी पाहता ती दूर करण्यासाठी कोणतेही प्रभावी पाऊल या अर्थसंकल्पातून उचलले दिसत नाही.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

विकेंद्रीत स्वरूपातील औद्योगिकीकरणाकडे या अर्थसंकल्पात लक्ष दिलेले दिसत नाही. एकूण काय तर सर्वच क्षेत्रात निराशा दर्शवणारा हा अर्थसंकल्प आहे.

हेही वाचा - 'या देशात पुन्हा मनुस्मृती राज येऊ देणार नाही, ते कागद मागायला आले तर त्यांना संविधान दाखवा'

ABOUT THE AUTHOR

...view details