महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांनी मानले गौतम अदानींचे आभार; नेमकं कारण काय? - Sharad Pawar

Sharad Pawar Praises Gautam Adani : एकीकडं कॉंग्रेससह शिवसेना ठाकरे गट उद्योगपती गौतम अदानींविरोधात आक्रमक होत असाताना दुसरीकडं शरद पवारांनी अदानींनचे आभार मानले आहेत.

Sharad Pawar Praises Gautam Adani
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 7:14 AM IST

बारामती Sharad Pawar Praises Gautam Adani : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमात उद्योगपती गौतम अदानींचे आभार मानले आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी विभागातील रोबोटिक लॅबचं उद्घाटन शरद पवार आणि उद्योगपती दीपक छाबडिया यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात शरद पवारानी अदानींचे आभार मानले आहेत.

काय म्हणाले शरद पवार :या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, "आपण संस्थेच्या मार्फत जगातलं पहिलं नव टेक्नॉलॉजी सेंटर बनवत आहोत. याला 25 कोटी रुपये लागणार होते. यासाठी 25 कोटी रुपयांचा धनादेश उद्योगपती गौतम आदानींनी दिलाय. त्यांचं नाव या ठिकाणी मला घेतलं पाहिजे. आपल्या भागात उसाची शेती जास्त आहे. उसाची साखर बनवण्यासाठीच तंत्रज्ञान जगात झपाटयानं बदलतंय. असं तंत्रज्ञान इथं आण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जगात जे नवीन आहे, ते सगळं आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत" असं शरद पवार म्हणाले.

आपल्याकडं तरुणांची मोठी शक्ती : पुढं बोलताना शरद पवार म्हणाले की, "इंजिनिअरिंग क्षेत्रात टेक्नॉलॉजीचा वापर झपाट्यानं वाढतोय. आपणही नवा बदल स्वीकारला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर काम करणाऱ्या लोकांची देशाला आणि जगाला गरज निर्माण झालीय. आज आपण बारामतीत जे बनवत आहोत, त्याचा उपयोग सगळ्या विद्यार्थ्यांना होईल. जगातील भरपूर वस्तूच्या उत्पादनाचा कल चीनकडं आहे, हा कल भारताकडं कसा आणला जाईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे," असंही शरद पवार म्हणाले. "भारताकडं तरुणांची मोठी शक्ती आहे. अनेकदा भारताला तरुणांचा देश असंही म्हटलं जातं. या सगळ्या तरुण शक्तीचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. प्रत्येक बदल हा आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जात" असंही शरद पवारांनी म्हटलंय.

अदानींवरुन महाविकास आघाडीत दुमत : एकीकडं महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करत असताना दुसरीकडं त्याच आघाडीचे घटक असलेल्या शरद पवारांनी मात्र आपली भूमिका कायम ठेऊन अदानींची पाठराखण केलीय. देशातील उद्योग विकासांमध्ये गौतम अदानींचं मोठं योगदान असल्याचं शरद पवारांनी या आधीही अनेकदा सांगितलंय. तसंच गौतम अदानी यांची संसदेच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून चौकशी करा, या राहुल गांधीच्या मागणीलाही त्यांनी विरोध केला होता. यामुळं महाविकास आघाडीतच अदानींवरुन दुमत असल्याचं दिसून येतंय.

हेही वाचा :

  1. विमानतळ, कोळसा खाणी सर्व अदानींनाच? टाटांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा परखड सवाल
  2. अदानी प्रकरणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद? शरद पवारांकडून अदानींची पाठराखण?

ABOUT THE AUTHOR

...view details