महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar : '..म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे', शरद पवारांचा मोठा आरोप - Sharad Pawar press conference

सत्ताधारी पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही अपेक्षा आहेत ज्या पूर्ण होत नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसेच मला पंतप्रधान पदाची कुठलीही अपेक्षा नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

Sharad Pawar
शरद पवार

By

Published : May 22, 2023, 9:24 PM IST

Updated : May 22, 2023, 10:07 PM IST

शरद पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी यंत्रणांकडून प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केले जात असून, सत्ताधारी पक्षाला राष्ट्रवादीकडून काही अपेक्षा आहेत ज्या पूर्ण होत नसल्याने अशी कारवाई होत असल्याची टीका शरद पवार यांनी केली. परंतु आम्ही कुठल्याही संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

नवाब मलिक यांचा छळ करण्यात आला, प्रसारमाध्यमांमध्ये सत्य सांगण्याची किंमत त्यांना मोजावी लागली. नवाब मलिक जे बोलत होते ते बरोबर ठरले आहे. पुढे काय होते ते पाहू - शरद पवार, एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर बोलताना

'पंतप्रधान पदाची अपेक्षा नाही' :मला पंतप्रधान पदाची कुठलीही अपेक्षा नाही. मी निवडणूकच लढणार नसल्यामुळे तो प्रश्नच उरत नाही. परंतु भाजपाच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे शरद पवार आज म्हणाले. उद्या पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. मी सुद्धा त्यांना भेटून विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

'2000 नोटा बंद झाल्याने सर्वसामान्यांना त्रास होणार' : रिझर्व बँकेने 2000 च्या नोटांना चलनातून मागे घेतले आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास होतो आहे. हे म्हणजे कोणीही उठायचं आणि लहरी निर्णय घ्यायचा, अशी टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली. पहिल्या नोटबंदी मध्ये काळा पैसा काही बाहेर आला नाही, परंतु अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. अनेक लोक बेरोजगार झालेत. अनेक बँकांनी जुन्या नोटा दिल्या नाहीत. त्याने देशाचे मोठे नुकसान झाले तसेच बँकांचेबी झाले. आताही 2000 नोटा बंद झाल्याने सर्वसामान्यांचेच नुकसान होणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

जागावाटपावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. माझ्या निवासस्थानी एक बैठक झाली जिथे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते यावर निर्णय घेतील असे ठरले आहे. उद्धव ठाकरे, सोनिया गांधी किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि मी एकत्र बसून यावर चर्चा करू - शरद पवार, महाविकास आघाडीतील जागावाटपावर बोलताना

हेही वाचा :

  1. Devendra Fadnavis On Jayant Patil : जयंत पाटलांवरील ईडीच्या कारवाईबाबत फडणवीस म्हणाले, 'तपास यंत्रणा..'
  2. Nana Patole : मोहन भागवतांना भेटल्यावर समीर वानखेडे यांची चौकशी का? नाना पटोले यांचा गंभीर सवाल
  3. Aaditya Thackeray : 'विरोधकांना ईडीची भीती; आम्ही जयंत पाटलांच्या पाठिशी उभे'
Last Updated : May 22, 2023, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details