महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar on KCR Maharashtra Visit : केसीआर  यांच्याकडून राजकीयदृष्ट्या वेगळे चित्र दाखविण्याचा प्रयत्न-शरद पवार - तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केसीआर यांच्या आव्हानाविषयी भाष्य केले. त्याचप्रमाणे शदर पवार यांनी अजित पवार यांनी केलेल्या मागणीवर त्यांनी आपले मत मांडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार

By

Published : Jun 26, 2023, 1:01 PM IST

बारामती (पुणे) : तेलगंणाचे मुख्यमंत्री केसीआर आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज आणि उद्या असा त्यांचा दोन दिवसीय दौरा असणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात केसीआर म्हणजे के. चंद्रशेर राव यांना उतरायचे आहे. केसीआर प्रस्थापितांना धक्का देतील असे म्हटले जाते. परंतु आगामी काळातील निवडणुकामध्येच त्यांचे आव्हान काय हे समजून येईल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ते बारामती येथे पत्रकारांशी बोलत होते.

राजकीयदृष्ट्या वेगळे चित्र : केसीआर राज्यातील राजकारणात उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. राज्यातील राजकारणात येण्यासाठी केसीआर हे शेतकरी, कोरडवाहू भागातील शेतकरी, दलित लोकांना लक्ष्य करत आहेत. यामुळे राज्यातील प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आगामी काळात ते आव्हान निर्माण करतील का हे निवडणूकीतच दिसेल. केसीआरने महाराष्ट्रातील कांद्यांच्या मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु संपूर्ण राज्याचा विचार केला तर कांदा हे पीक फक्त पश्चिम महाराष्ट्रात होतो. नाशिक, धुळे व तीन चार जिल्ह्यात जिरायत शेतकरी कांदा पीक घेतात. दरम्यान काही वृत्तपत्रात, अशा बातम्या आल्या होत्या की, येथील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी हैदराबादला नेला. परंतु तेथे त्यांची फजिती झाली. त्यामुळे हे थोडे राजकीयदृष्ट्या वेगळे चित्र दाखवू शकतो. एवढाच त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांना सेवा करायची असेल तर त्यांचे स्वागत आहे. केसीआर हे 600 गाड्याचा ताफा घेवून येणार आहेत. यावर शरद पवार म्हणाले की, त्यांच्याकडे साधन, संपत्तीची चिंता नाही. त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे.

अजित पवारांची मागणी पूर्ण होणार ? : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्यावरुन अनेक बदल घडत आहेत. सुप्रिया सुळे आणि प्रफ्फुल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष बनवल्यानंतर पक्षात भाकरी फिरवल्याची सर्वत्र झाली. अशात अजित पवार यांनी पक्ष मेळाव्यात बोलताना आपल्याही पदाची भाकरी फिरवावी. आपल्याला प्रदेशाध्यक्ष बनवण्यात यावे, अशी मागणी केली. दरम्यान अजित पवार यांच्या मागणीवरुन अनेक तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. या तर्क-वितर्कावर शरद पवारांनी आपले मत मांडले आहे. हा निर्णय मी एकटा घेत नाही. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर पक्षातील प्रमुख लोक बसून त्यातून निर्णय होईल, असे शरद पवार म्हणाले.

फडवणीस यांना लगावला टोला-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसींवर अन्याय होत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते. ते ओबीसी नेते आहेत. मधुकर पिचड कोण होते? सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही होते. देवेंद्र फडणवीसांचे अज्ञान आहे. त्यांची किती वाचन आहे, हे माहीत नाही. त्यांची टीका वास्तवावर आधारित नाही, असेही शरद पवार म्हणाले

हवामान खात्यावर पवारांचा विश्वास : गेल्या 5-6 दिवसांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात फरक आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी अतिशय चिंतेचे वातावरण राज्यात होते. पाऊस नव्हता. पण गेल्या दोन दिवसात हवामानात बदल दिसत आहे. त्याचा परिणाम कुठे ना कुठे पाऊस होताना दिसत आहे. हवामान खात्याचा अहवाल, या पाच दिवसांसाठी अनुकुल आहे. या खात्याचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव बघितला तर अतिशय वास्तव माहिती देत आहे. त्यामुळे ही काळजीच्या टक्केवारीत कमी झाल्याचे दिसू येते.

हेही वाचा -

  1. Opposition Parties Meeting Patna: विरोधी पक्षांच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा? शरद पवारांनी दिले उत्तर
  2. Sharad Pawar News: एकनाथ शिंदे प्रश्नांची जाण असणारे मुख्यमंत्री- शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details