महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivanand Haibatpure : जातीद्वेषाच्या राजकीय करामतीचे सुत्रधार हे बारामतीचे शरद पवारच आहेत - शिवानंद हैबतपूरे - भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे

बारामती शहर भाजपाच्या कार्यालयावरील फलकाला काळे फासणारे हे नेमके कोणाचे बगलबच्चे आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. जातीद्वेषाच्या राजकारणाची बिज ही शरद पवारांनीच पेरली असुन आज राज्यातील वातावरण दुषित करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे यांनी बारामती येथे केला.

Shivanand Haibatpure
शिवानंद हैबतपूरे

By

Published : Dec 13, 2022, 4:09 PM IST

बारामती : बारामती शहर भाजपा कार्यालयावर काळे फासल्याची घटना घडल्यानंतर शिवानंद हैबतपूरे यांनी बारामती येथील कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे म्हणाले की, भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्याचा विपर्यास जाणिवपूर्वक केला गेला. अगदी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर ही दादा पाटलांवर शाईफेक करण्यात आली.

काळे फासणाऱ्याला एक्कावण्ण हजार रुपयांचे बक्षीस जाहीर : त्पूर्वी बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व सोमेश्वर सहकारी साखर कारखाण्याचा संचालक ऋषीकेश गायकवाड याने चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर काळे फासणाऱ्याला एक्कावण्ण हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. राजकारणात या तालिबाणी फतव्यांना घोषित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा हीच चंद्रकांत दादा पाटील यांच्या वरील हल्ल्याला कारणीभूत ठरली. आज नेमके बारामती शहर भाजपा कार्यालयाच्या फलकावर काळे फासले गेले. वास्तविक बारामती शहर भाजपा कार्यावयावरील फलकाला काळे फासले नसून हे संविधानावर व लोकशाही प्रकियेवर काळे फासले गेले असल्याचे मत भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे (Shivanand Haibatpure) यांनी व्यक्त केले.


भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मान्यवर उपस्थित :बारामती शहर भाजपा कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत या प्रसंगी उपस्थित पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गोविंद देवकाते, भाजपा शहराध्यक्ष सतीश फाळके, यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर, प्रदेश अनुसूचित मोर्चा सदस्य सचिन साबळे, बाळासाहेब शिवसेनेचे नेते देवेंद्र बनकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम थोरात, सुहास टकले आदि मान्यवर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details