बारामती - राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज ८० वाढदिवस राज्यभरात साजरा केला जात आहे. शरद पवार यांचे राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातही मोलाचे योगदान आहे. पुरोगामी महाराष्ट्रात काही महत्वाच्या निर्णयांची अंमलबजाबणी करण्यात पवारांनी पुढाकार घेतला होता. आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयाबाबतच्या आठवणींना डॉ. मुरलीधर घोळवे यांनी उजाळा दिला आहे.
विविध क्षेत्रात महिलांना संधी -
महाराष्ट्रासह देशभरातील महिलांना चूल आणि मूल या मर्यादेपलीकडे जात राष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा 50 टक्के वाटा आहे. हा विचार लक्षात घेऊन शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विविध क्षेत्रात महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महिला आज विविध क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असल्याचे दिसते. महिलांसंबंधी महाराष्ट्र राज्यात राबवण्यात आलेले हे धोरण पुढे संपूर्ण देशात राबवले जात आहे. पुढे केंद्रीय संरक्षण मंत्री असतानाही पवारांनी गृह खात्यात महिलांना काम करण्याची संधी दिली. पवार साहेबांचे हे महिलां संबंधीचे कार्य सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखे आहे.
शरद पवार : महिलांना 50 टक्के आरक्षण देणारे समतावादी नेते - डॉ. मुरलीधर घोळवे क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल....जागतिक स्तरावर क्रिकेट क्षेत्रात अद्यापपर्यंत कोणीही केले नाही, असे कार्य शरद पवार यांनी क्रिकेट क्षेत्रात केले आहे. भारतीय क्रिकेट क्षेत्रात त्यांनी आर्थिक स्थैर्य निर्माण केले. जे खेळाडू देशासाठी खेळत आहेत. त्या खेळाडूंचे आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी खेळाडूंसाठी पेन्शन योजना चालू केली. पवारांनी आत्तापर्यंत ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्या प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केल्याचे आपल्याला दिसून आले असल्याचे घोळवे यांनी सांगितले.
भारताच्या कृषी क्षेत्राचा विकास -
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु मागील काही काळात भारताला इतर देशातून अन्नधान्य मागवावे लागत होते. मात्र, शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेती विकासाकडे लक्ष देत आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांच्या या कार्यामुळे भारत इतर देशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यास अग्रेसर झाला आहे. कृषी क्षेत्राची झालेली उल्लेखनीय प्रगती हे शरद पवार यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचेच फळ आहे. कधीकाळी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाही उच्चवर्गीयांची जीवनशौली केवळ पवारांच्या दुरदृष्टीच्या धोरणांमुळे आज आत्मसात करता आली असल्याचे मत घोळवे यांनी व्यक्त केले.