महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरण; पत्नी स्वाती मोहळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट - शरद मोहोळ

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी रविवारी (7 जानेवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. भेटीत काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे.

Sharad Mohol Murder Case
स्वाती मोहळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 9:45 PM IST

Updated : Jan 7, 2024, 9:56 PM IST

पुणे Sharad Mohol Murder Case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा दोन दिवसांपूर्वी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या घटनेनं पुणे शहरात शांतता पसरली आहे. खून करणाऱ्या आठ आरोपींसह दोन वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी रविवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अजून मिळालेली नाही.

गुंडाच्या पत्नीनं घेतली फडणवीसांची भेट : कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्यानंतर शहरात मोठं दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. गुंड कुठला का असेना त्याचा आम्ही बंदोबस्त करू, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिली होती. त्यानंतर रविवारी त्याच गुंडाच्या पत्नीनं गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्यात दोन मिनिटांचा संवादसुद्धा झाला आहे. पुण्यातील भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ही भेट झाली आहे.

गुन्हेगार आणि राजकारण : देवेंद्र फडणवीस पुण्यात भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्याचठिकाणी स्वाती मोहोळ त्यांच्या कार्यकर्त्यांसह आल्या होत्या. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस परत निघत होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या गाडीजवळच भेट घेऊन संवाद साधला.

भेटीत काय झाली चर्चा? : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ गेल्या काही दिवसापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्या स्वतः भाजपाच्या कोथरूड भागातल्या पदाधिकारी आहेत. ज्यावेळेस त्यांचा पक्षप्रवेश झाला, त्यावेळेस भाजपावर टीका करण्यात आली होती. परंतु, ती व्यक्ती वेगळी आहे, ही व्यक्ती वेगळी अशी प्रतिक्रिया भाजपाकडून देण्यात आली होती. दोन दिवसापूर्वी शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर स्वाती मोहोळ यांनी रविवारी फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्या भेटीत काय चर्चा झाली हे गुलदस्त्यातच आहे.

हेही वाचा -

  1. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गँगवॉरनं पुन्हा काढलं डोकं वर; 'हे' आहेत कारणं
  2. शरद मोहोळ हत्या प्रकरण : 'मी' मामासाठी हत्या करणार, आरोपीचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर
  3. अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपा आमदाराची दादागिरी, सुनील कांबळेंची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
Last Updated : Jan 7, 2024, 9:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details