पुणे - रंगीबेरंगी रांगोळीने शनिवारवाड्यापुढील पटांगण खुलले होते. कार्यकर्त्यांची गडबड सुरू होती. इंग्रजांनी बंद केलेला शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा उघडला गेला अन् इतिहासप्रेमींनी मुख्य दरवाजातून वाड्यात प्रवेश केला. निमित्त होते शनिवारवाड्याच्या 288व्या वर्धापनदिनाचे. बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात शनिवारवाड्याचे मुख्य दरवाजे अनेक वर्षांनी उघडण्यात आले होते.
हेही वाचा -डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला
नानासाहेब पेशव्यांच्या हस्ते २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत झाली होती. त्यामुळे २२ जानेवारी हा दिवस शनिवारवाड्याचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ब्रिटिशांनी भारत सोडताना शनिवारवाड्याचे दरवाजे बंद केले होते. एरवी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या तीन दिवशी ध्वज वंदनासाठी वाड्याचे दरवाजे उघडण्यात येतात. मात्र, त्यावेळी पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. हा अपवाद वगळता इतरवेळी वाड्याचे दरवाजे कायमस्वरूपी बंद असतात.
ऐतिहासिक शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा उघडतो तेव्हा.. हेही वाचा -'डीएसकेच्या जप्त मालमतेच्या लिलावातून आधी ठेवीदारांचे पैसे परत करा'
शनिवार वाड्याच्या 288 व्या वर्धापनदिनी सकाळी 9 वाजता दिल्ली दरवाजा उघडण्यात आला. काही वेळ हा दरवाजा खुला ठेवण्यात आला. उघडलेल्या दरवाजातून वाड्यात प्रवेश करण्याची ही दुर्मिळ संधी घेऊन इतिहासप्रेमींनी वेगळ्या नजरेने शनिवार वाडा अनुभवला. यावेळी श्रीमंत थाेरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इतिहास तज्ज्ञ माेहन शेटे, पेशव्यांचे वंशज उद्यसिंह पेशवा यावेळी उपस्थित होते.