पुणे - चित्रपट क्षेत्रातील ६०० लोकांनी आम्हाला विरोध केला आहे, पण त्या क्षेत्रातील हजारो लोक आमच्या बरोबर आहेत. सन्मान ही परत करायची गोष्ट नसते, हे या अवॉर्ड गँगला समजायला हवे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे. ते आज पुण्यात बोलत होते.
अवॉर्ड वापसी गँगच्या भूमिकेमुळे भाजपलाच फायदा - शाहनवाज हुसैन - पुणे
चित्रपट क्षेत्रातील ६०० लोकांनी आम्हाला विरोध केला आहे, पण त्या क्षेत्रातील हजारो लोक आमच्या बरोबर आहेत, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी आज पुण्यात केले.
प्रत्येक व्यक्तीला मताचा एकच अधिकार असतो. मग तो राष्ट्रपती असो किंवा मग शाहनवाज हुसेन किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे कलाकार असोत. सगळ्यांना मताचा समान अधिकार आहे. जर समजा संबंधित कलाकारांना त्यांचे मत राजकीय पटलावर, अशा पद्धतीने मांडायचे असेल, तर त्यांनी थेट राजकारणात यावे. नुकतेच एका कलाकाराने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जर कलाकारांना आमच्या क्षेत्रात यायचे आहे, तर त्यांनी थेट राजकारणात यावे, त्यांनी भ्रम निर्माण करू नये. या अवॉर्ड वापसी गँगमुळे आमची ६०० मते कमी झाली, तरी त्यांच्या आवाहनामुळे नाराज झालेल्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यासर्वांची मते भारतीय जनता पक्षाला मिळतील, असेही ते यावेळी बोलले.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासंदर्भात काँग्रेसने केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षामध्ये अनेक मोठे नेते होते. त्यांना काँग्रेसने ज्या पद्धतीने वागवले आहे, ते पाहता काँग्रेसला भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.