महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sexual Assault With Animal : लैंगिक भूक भागवण्यासाठी रेडकावर करायचा अनैसर्गिक अत्याचार; वाचा कसं फुटलं बिंग - रेडकावर करायचा अनैसर्गिक अत्याचार

Sexual Assault With Animal : जनावरांच्या गोठ्यात कोणीही नसल्याचा फायदा उचलत एका 24 वर्षीय युवकाने म्हशीच्या दीड वर्षीय रेडकावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural torture on Buffalo Calf) केला. ( Unnatural Sexual Assault With Calf) हा प्रसंग तेथील सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद (act of torture caught on CCTV) झाला. यानंतर मालकाला संशय आल्यानं त्यानं सीसीटीव्ही फुटेज तपासलं (Pimpri Chinchwad) असता आरोपीचा कारनामा समोर आला. (Sexual Assault With Animal) पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात ही घटना घडली आहे. (Pimpri Chinchwad Crime) वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण...

Sexual Assault With Animal
अशाप्रकारे फुटले बिंग

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 6:45 PM IST

प्राण्यासोबत लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाचे कुकृत्य सांगताना पोलीस अधिकारी

पिंपरी चिंचवड (पुणे)Sexual Assault With Animal :माणुसकीला लाजवणारी एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातून समोर आली आहे. शहरात एका 24 वर्षीय व्यक्तीने म्हशीच्या रेडकावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या व्यक्तीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने म्हशीच्या दीड वर्षांच्या रेडकाचे पाय बांधून छळ करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकरणी गणेश पंडित जाधव (रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटना 'सीसीटीव्ही'मध्ये झाली कैद :पोलिसांनी रामकिशन श्रीराम भवन चव्हाण (रा. जाधववाडी, चिखली, मूळ गाव- महाराजागंज, उत्तर प्रदेश) या आरोपीस अटक केली आहे.


कामाच्या शोधात आला आणि केले भलतेच काम :चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरातील जाधववाडी येथे एका सोसायटीमध्ये उत्तर प्रदेश येथून रामकिशन चव्हाण हा कामधंद्याच्या शोधात पिंपरी चिंचवड शहरात आला होता. त्याच्या घराच्या बाजूलाच एक गाय आणि म्हशींचा गोठा होता आणि त्या गोठ्यात म्हशीचे दीड वर्षांचे रेडकू होते. रामकिशन चव्हाण ही व्यक्ती म्हशीच्या रेडकूचे पाय बांधून त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करत होती. रेड्यासोबत हा प्रकार 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सुरू होता. सोमवारी जेव्हा पुन्हा म्हशीच्या दीड वर्षांच्या रेडकूला गोठ्यात कुणीच नसताना आरोपीने त्याचे पाय बांधून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर तो तेथून निघून गेला.

आरोपीला अटक :गोठा मालक गणेश पंडित जाधव यांच्या वडिलांनी गोठ्यात पाहिले असता रेडकूचे पाय बांधलेले दिसले. त्यानंतर मात्र त्यांनी लागलीच सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीमध्ये शेजारी राहणारा रामकिशन हा रेडकूवर अनैसर्गिक अत्याचार करीत असल्याची बाब उघडकीस आली. आरोपी कोण आहे ते कळल्यावर गोठ्याच्या मालकांनी त्याला पकडून चिखली पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांनी रामकिशन चव्हाण याला अटक केली असून पुढील तपास चिखली पोलीस करीत आहे.

हेही वाचा:

  1. Accused Of Robbery Arrested: एक्झॉस्ट फॅनमधून दुकानात मध्यरात्री प्रवेश करून लंपास केले 10 लाख, झारखंडमधून आरोपीला अटक
  2. Knife Attack On Youth: भांडणाच्या रागातून तरुणाच्या पोटात खुपसला चाकू, २० तासानंतर ऑपरेशन करून चाकू काढला
  3. Woman Kidnapping Case: तीन लाखांसाठी मैत्रिणीचे अपहरण; अपहरकर्त्या मैत्रिणीसह ७ जणांच्या टोळीचा शोध सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details