पुणे - शहरात ३ आणि ५ वर्षाच्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर शेजारीच राहणाऱ्या एका नराधमाने लैंगिक अत्याचार केले. ही घटना मंगळवारी (१९ मार्च) दुपारी घडली. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात दोन सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार - अत्याचार
पीडित मुलींची आई धुण्या-भांड्याचे काम करते. मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामाला गेली असता शेजारीच राहणाऱ्या नराधमाने घरात कोणी नसल्याची संधी साधून दोघींवरही लैंगिक अत्याचार केले.
पीडित मुलींची आई धुण्या-भांड्याचे काम करते. मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामाला गेली असता शेजारीच राहणाऱ्या नराधमाने घरात कोणी नसल्याची संधी साधून दोघींवरही लैंगिक अत्याचार केले. या मुलीची आई धुण्या-भांड्याचे काम आटोपून संध्याकाळी घरी आल्यानंतर पीडित मुलींनी घडलेली सर्व घटना आईला सांगितली. त्यावर आईने लगेच कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. संशयित नराधम अद्याप फरार असून पोलीस तपास सुरु आहे.