पुणे : या प्रकरणात येरवडा पोलिसांनी (Sexual abuse of minor boy) अत्याचार करणार्या संबधित 25 वर्षीय संशयितासह एक परिचारिका व चार सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Yerawada psychiatric hospital)
पॉक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीचा कारनामा :खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात बालनिरीक्षण गृहातून येरवडा मनोरुग्णालयात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा व त्याच्या हातात तब्बल १८ इंजेक्शनच्या सुया आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात 16 वर्षीय मुलाला सुरुवातीला येरवडा येथील बाल न्यायमंडळाच्या निरीक्षणगृहात दाखल केले होते. त्यानंतर त्याला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. तेथे अगोदरच पॉस्कोच्या गुन्ह्यातील एक 25 वर्षांचा युवक दाखल होता. यावेळी 16 वर्षीय मुलावर त्या 25 वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केले आहे.
सहकाऱ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार: आर्थर रोड कारागृहात कैद्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना 13 जून, 2023 रोजी घडली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या दोन कैद्यांनी हे कृत्य केले आहे. याशिवाय आरोपींनी फिर्यादीला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पीडित 23 वर्षांचा तरुण: दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. आता चक्क कारागृहातच अशी घटना घडल्याचे समोर आले आहे. आर्थर रोड कारागृहात बंदी असलेल्या एका २३ वर्षांच्या तरुणावर अन्य दोन आरोपींनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेव्हा इतर कैदी झोपले होते. समीर शेख उर्फ पुडी आणि राशीद फराज अशी या आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करुन अनैसर्गिक लैंगिक अत्याचार: मूळचा उत्तरप्रदेशमधील रहिवासी असलेला २३ वर्षीय तक्रारदार तरुण हा आर्थर रोड कारागृहात न्यायबंदी आहे. तर आरोपी समीर शेख उर्फ पुडी आणि फराज हे अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात अटकेत असून ते सूद्धा आर्थर रोड कारागृहात बंदी आहेत. या दोन्ही आरोपींनी तक्रारदार तरुणाला 6 जूनच्या रात्री पावणे दोनच्या सुमारास कारागृहातील स्नानगृहाच्या कोपऱ्यात नेत मारहाण करुन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी या आरोपींन त्याला दिली होती.
हेही वाचा:
- Sambhajinagar Crime : अल्पवयीन मुलावर नशेखोर दोघांचा अनैसर्गिक अत्याचार; एकाला अटक
- Gold Smuggling Case: सोने तस्करीकरिता वाट्टेल ते... महिलेने चक्क गुप्तांगात लपवून आणलेले तब्बल २० लाख रुपयांचे सोने
- Boyfriend Kidnapping Case: प्रेयसीने विवाहित प्रियकराचे केले अपहरण; मारहाण करून लुटले दागिने