महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील कोंढव्यात सात मजली इमारतीला भीषण आग - फ्रिजचा स्फोट

पुण्याच्या कोंढव्यातील सात मजली इमारतीमधील एका घरात फ्रिजच्या स्फोटमुळे आग लागली. आगीत गॅस सिलेंडरनेही पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आणि फरशा उध्वस्त झाल्या.

पेटलेली इमारत
पेटलेली इमारत

By

Published : Dec 17, 2019, 3:48 AM IST

Updated : Dec 17, 2019, 7:01 AM IST

पुणे- कोंढव्यातील कुमार सुरक्षा या सोसायटीमधील एका इमारतीतील पाचव्या मजल्यावरील एका घरात फ्रिजचा स्फोट झाल्याने आग लागली. त्या आगीमुळे घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. ही घटना सोमवारी (दि. 16 डिसें) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.

घरात लागलेली आग

आगीमुळे मोठ्या ज्वाला आणि धूर पसरत होते. यात त्या घरातील मौल्यवान वस्तू भस्मसात झाल्या. त्याचबरोबर शेजारील घरेही काळवंडली आहेत. स्फोटाने घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आणि फरशी उध्वस्त झाली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 बंब घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली. यावेळी 5 ते 6 रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आग लागलेल्या घरात कोणी नसल्याने जीवित हानी टळली. या सोसायटीत दीडशे नागरिक राहतात. आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली.

हेही वाचा - कुस्तीप्रेमींसाठी खुशखबर..! ६३ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा पुण्यात

Last Updated : Dec 17, 2019, 7:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details