महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 7 पोलीस कर्मचारी, अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह - पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर, आतापर्यंत पोलीस आयुक्तालयात 24 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी, 15 जण हे कोरोनामुक्त झाले असून ते कर्तव्यावर रुजू झाले आहेत. तर, 9 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 7 पोलीस कर्मचारी, अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 7 पोलीस कर्मचारी, अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : Jul 1, 2020, 8:34 PM IST

पुणे : येथील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आज(बुधवार) 7 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 24 वर पोहचली आहे. यापैकी 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून काहीजण कर्तव्यावर रुजूदेखील झाले आहेत. दरम्यान, एकाच दिवशी 7 जण करोनाबाधित आढळल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असून प्रशासनासमोर मोठे आव्हान असताना त्यात पोलीस विभागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंतेत भर पडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आज अधिकारी, कर्मचारी मिळून 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, आतापर्यंत आयुक्तालयात एकूण 24 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी, 15 जण हे कोरोनामुक्त झाले असून ते कर्तव्यावर रुजू झाले आहेत. तर, 9 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधिकऱ्यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच कोरोनाची बाधा झाल्याने चिंत व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली असून त्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details